व्हर्च्युअल क्लासरूम

व्हर्च्युअल क्लासरूम एक ऑनलाइन वर्ग आहे ज्याद्वारे प्रशिक्षकांना आणि विध्यार्थ्यांना रिअल-टाइममध्ये एकमेकांशी संवाद साधता येतो. यामुळे प्रशिक्षक आणि विध्यार्थी एकमेकांपासून दूर असून सुद्धा पारंपारिक वर्गातील शिक्षणाचा अनुभव घेतात.
व्हर्च्युअल क्लासरूमच्या मदतीने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिकवणे सोपे झाले आहे.
व्हर्च्युअल क्लासरूमचे फायदे:
- थेट परस्परसंवाद प्रशिक्षण सत्रे
- विद्यार्थी कोठूनही शिकू शकतात
- परिचालन खर्च कमी होतो
- विद्यार्थ्यांना परवडणारे अभ्यासक्रम उपलब्ध करता येतात
- मोठ्या पातळीवर प्रशिक्षण सत्र आयोजित करता येतात
आमचे व्हर्च्युअल क्लासरूम कसे काम करतात?
- आमच्या मुंबईतील मुख्यालयातून प्रशिक्षक वर्गात सामील होतो.
- विद्यार्थी त्यांच्या घरातून किंवा डीहबशी संबंधित संस्थांकडून वर्गात सामील होतात.
- प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात सामील होण्यासाठी वेगळा लॉगइन तपशील दिला जातो.
- ट्रेनर आपली / तिची इंटरॅक्टिव्ह स्क्रीन सामायिक करतो.
- विद्यार्थी कोणत्याही वेळी त्यांच्या शंका विचारू शकतात आणि प्रशिक्षक त्या शंका इंटरएक्टिव्ह स्क्रीन किंवा व्हाइटबोर्डद्वारे सोडवू शकतात.
मूलभूत आवश्यकता
- वर्गात सामील होण्यासाठी २ MBPS इंटरनेट कनेक्शन
- थेट प्रशिक्षण पाहण्यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप
- ट्रेनरशी संवाद साधण्यासाठी हेडफोन आणि माइक
- संगणक / लॅपटॉपशी जोडलेला फ्रंट कॅमेरा जेणेकरून प्रशिक्षक विद्यार्थी पाहू शकेल
- वेब ब्राऊसर(गुगल क्रोम)