डीहब बद्दल

"Simplicity is about subtracting the obvious and adding the meaningful."
— John Maeda

आम्ही कोण आहोत

डीहब ही माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील अत्याधुनिक अभिनव उपाय प्रदान करणारी उत्साही तज्ञ लोकांची एक टीम आहे.

आमच्याकडे ICT क्षेत्रात २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. विविध तंत्रज्ञान आणि उत्पादनांच्या सखोल ज्ञान आणि कौशल्यामुळे आम्ही आपल्या सर्व डिजिटायझेशनच्या गरजा पूर्ण करू शकतो.

आम्ही काय करतो

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, व्हर्च्युअल क्लासरूम आणि लाइव्ह लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाची कौशल्ये शिकवत आहोत.

तसेच, आम्ही शिक्षण, वैद्यकीय आणि व्यवसाय (एसएमई) क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) मूलभूत सुविधा पुरवून त्यांची व्यवसाय प्रक्रिया सुलभ करुन त्यांना मदत करतो.

आमची वैशिष्ट्ये

डिजिटायझेशन

आमच्या डिजिटायझेशन सोल्युशन्ससह आपल्या व्यवसाय प्रक्रिया सुधारित करा

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वापरुन आपल्या सहकार्‍यांशी / ग्राहकांशी दूरस्थपणे संवाद साधा

इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्स

इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्सच्या मदतीने सहयोग आणि कार्यक्षमता वाढवा

व्हर्च्युअल क्लासरूम

व्हर्च्युअल क्लासरूमच्या मदतीने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण सत्रे आयोजित करा

लाईव्ह स्ट्रीमिंग

आरोग्यसेवासाठी महत्वपूर्ण, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे आपल्या तज्ञ सहकाऱ्यांची मते जाणून घ्या

आमचे तज्ञ

आमच्या तज्ञांकडून संपूर्ण डिजिटायझेशन सोल्युशन्स आणि समर्थन मिळवा

आमची दृष्टी

अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची सोल्यूशन्स प्रदान करुन माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) उद्योगातील प्रशंसनीय व अग्रगण्य उद्योजक होणे.

आमचे ध्येय

शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यवसाय क्षेत्रातील संघटनांना कार्यक्षम प्रशिक्षण तंत्रज्ञान सेवा प्रदान करुन सक्षम बनविणे.